बेळगाव : हालसिद्धनाथ साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण

बेळगाव: हालसिद्धनाथ साखर कारखान्यातर्फे आयोजित कृषी प्रदर्शनात सौंदलगा येथील शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला. या शेतकऱ्यांना सौंदलगा विभागीय कार्यालयात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील म्हणाले कि, कारखान्याच्या ऊस विकास विभागाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. ड्रोन, खते, अवजारे, आधुनिक फवारणी मशीन, ऊस तोडणी मशीन, महिला बचत गट, ठिबक सिंचन, जैविक खते, रोपवाटिका असे प्रदर्शन भरवले होते.

शेतकऱ्यांनी ८६०३२, एसएनके १३०७३, ०२६५, व्हीएसआय १८१२१, ५१७, एसएनके १३३७४ या जातीचे ऊस प्रदर्शनासाठी आणले होते. शेतकऱ्यांना कारखान्यातर्फे संचालक प्रकाश शिंदे, किरण निकाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शिवगोंडा पाटील, आप्पासाहेब चौगुले, सर्जेराव पवार, रायगोंडा पाटील, शेखर पाटील, अनिल मेथे, राजाराम वैराट, प्रशांत पाटील, जोती परीट, सुरेश पाटील, रणजित व्हटकर, बाळासाहेब वैराट, सचिन पाटील, संजय पाटील, शुभम पाटील, सौरभ कोकणे. सोहम खोत व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here