बेळगाव : थकीत ऊस बिलप्रश्नी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

बेळगाव :दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.मात्र, साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना उसाची बिले दिलेली नाहीत.त्यामुळे शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.याबाबत, आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतला आहे.जिल्ह्यातील बैलहोंगल, संकेश्वर, बेळगावसह आठपेक्षा अधिक साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बिले थकविली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

ऊस पुरवठा केलेल्या साखर कारखान्यांनी त्वरित शेतकऱ्यांची बिले न दिल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.यासाठी साखर आयुक्तांसह कारखान्यांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीला बोलावले जाणार आहे.या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.सध्या पावसाअभावी जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र राज्य सरकारकडून दुष्काळ भरपाई देण्यामध्ये दिरंगाई धोरण अवलंबले आहे.त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here