बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना व लोककल्याण सौहार्द सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने जत्राट व परिसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील होते. परिसंवादात विश्वजित पाटील यांनी ऊस शेतीमध्ये एकरी उत्पादनात होत असलेली घट, वाढता ऊस उत्पादन खर्च, खतांच्या किमती, पूरस्थिती व नुकसान, त्यावरील उपाययोजनेबाबत माहिती दिली.
यावेळी मुख्य शेती अधिकारी नामदेव बन्ने यांनी ऊस बियाणे, रोप व कांडी लावण यातील फरक, रोग किडीचे महत्त्व व त्याच्यावरील उपाययोजना, तोडणी वाहतूक संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कृषी तज्ज्ञ सुरेश पाटील यांनी एकरी १०० टन उत्पादन गृहित धरून काम करत असताना, शेतीत कराव्या लागणाऱ्या पूर्व तयारीची आणि भरणी ते तोडणीपर्यंतच्या तांत्रिक बाबीची माहिती सांगितली. माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्ध नराटे, सेंटर इन्चार्ज बाळू वैराट, स्लीप बॉय मनोहर हरदारे, कुमार पाटील, संजू पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते. राजू कल्लोळे यांनी आभार मानले.