बेळगाव : शिरगुप्पी शुगर वर्क्सने यंदाच्या गाळप हंगामात १२ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. कल्लाप्पाण्णा मग्गेण्णावर यांनी ही माहिती दिली. येथील शिरगुप्पी शुगर वर्क्सचा यंदाच्या गाळप हंगामास प्रारंभ करून ते बोलत होते. ऊस उत्पादकांनी अधिकाधिक ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचे व्यवस्थापक अरुण फरांडे, संचालक महावीर सुगण्णावर, शेती अधिकारी महावीर बिरनाळे, वीरेंद्र जागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
माजी आ. मगेण्णावर म्हणाले, ऊस उत्पादकांनी पुरवठा केलेल्या उसाची बिले वेळेत जमा केल्याने ऊस उत्पादकांच्या विश्वासाला कारखाना पात्र ठरला आहे. कारखान्याचा वजन काटा चोख असल्याने गाळपाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले आहे. कारखान्याने ऊस उत्पादक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आजतागायत यशस्वी गाळप हंगाम पार पाडला आहे. यावेळी कारखाना व्यवस्थापक अरुण फरांडे, कौतुक मगेण्णावर, महावीर पाटील, उत्ताप्पा घाळी, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.