बेळगाव : साखर उद्योगाचा केंद्रबिंदू असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदारांसह कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दक्षिण भारत साखर संघाचे कर्नाटक राज्याचे नूतन अध्यक्ष व अथणी शुगरचे कार्यकारी संचालक योगेश श्रीमंत (तात्या) पाटील यांनी दिली. केंपवाड येथील अथणी शुगर्सच्या कार्यस्थळावर दक्षिण भारत साखर कारखान्यांच्या कर्नाटक राज्य अध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री श्रीमंत (तात्या) पाटील होते.
यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले की, योगेश पाटील यांना त्यांच्या खडतर परिश्रमामुळे देशातील विविध साखर उद्योग संघात निवड झाली आहे. ते आगामी काळात साखर उद्योगाला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस नक्कीच आणतील. आमचे वडील व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी आम्हा तिघा भावंडांना दिलेली आदर्श शिकवणीमुळे जनतेची सेवा बजावत आहोत. यावेळी आप्पासाहेब आवताडे, गजानन मंगसुळी, अभय अकिवाटे, भाऊसाहेब जाधव, शिवानंद पाटील, प्रकाश कुमठोळी, अभय पाटील, उत्कर्ष पाटील, कारखान्याचे संचालक उत्तम पाटील, अब्दुलबारी मुल्ला, सुधाकर भगत, बाळू हजारे, प्रकाश हळ्ळोळी, नानासाहेब आवताडे, निंगाप्पा खोकले, आर. एम. पाटील, ईश्वर कुंभार, बी. ए. पाटील आदी उपस्थित होते.