या योजनेच्या लाभार्थ्याना राज्य सरकार डाळ व आटा उपलब्ध करुन देत आहे. काँग्रेस पक्षाने लाभार्थ्यांना आश्वासन दिले होते की, त्यांना चहा आणि साखर देखील पुरवली जाईल. परंतु सरकार अजूनही आपले आश्वासन पूर्ण करु शकलेले नाही. मतदानाला अवघें एक वर्ष शिल्लक असताना,आश्वासन पूर्ण केले जात आहे.
पंजाबचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भारत भूषण आशु यांनी सामेवारी चंदीगढ मध्ये सांगितले की, योजनेचा लाभ वाढवण्यासाठी विभागाने राज्याच्या वित्त विभागाकडे 760 कोटींची मागणी केली आहे.
आश्वासन पूर्ण करण्यास उशीर झाल्याबद्दल ते म्हणाले, सरकारने गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी दिलेला निधी बाजूला ठेवला होता परंतु कोविड मुळे त्यांना या योजनेचा विस्तार करता आला नाही. त्यांनी सांगितले की, 21 जानेवारीपासून त्यांना हा लाभ देण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात गेल्या तीन महिन्यांच्या तिमाहीत त्यांनी 160 कोटींची मागणी केली आहे.
ते म्हणाले, लॉकडाउनमध्ये सरकारने गरजू आणि स्थलांतरित कामगारांना 10 किलो आटा, 2 किलो साखर आणि 2 किलो डाळीची 15 लाख ड्राय रेशन पाकिटे वाटली. मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीतून राज्यात 78.2 कोटी रुपये खर्च झाला. याव्यतिरिक्त प्रवासी/गैर एनएफएसए लाभार्थ्यांना वितरणासाठी जिल्हा लुधियानाला 2 लाख कोरडे रेशन पॅकेट देखील देण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रत्येक कुटुंबात दरमहा ५ किलो गहू आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो डाळी वाटप करण्यात आल्या.
जवळपास 95 टक्के लाभार्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत एकूण 5.35 लाख मे टन गहू आणि 27,516 मे टन उडीद डाळ यांचे वितरण करण्यात आले. स्थलांतरित आणि एनएफएसए लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 5 किलो गहू आणि प्रत्येक कुटुंबासाठी 1 किलो डाळीचे वाटप दोन महिन्यांसाठी विनामूल्य केले गेले.
आशु म्हणाले, परिवहन शुल्कातील अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक पावले उचलली आहेत. ट्रक युनियनचे कार्टेलिझेशन तोडून सहभाग वाढविण्यासाठी वाहतुकीसाठी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक आणि पारदर्शक केली गेली आहे.
शेतकर्यांना वेळेवर देय देण्याबाबत ते म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय आणि बँकांचे कन्सोर्टियम या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नेतृत्वात प्रभावी समन्वय आणि संपर्क साधून शेतकरी आणि अन्य भागधारकांना देय देण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.