सोनहिरा कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पास बेस्ट पुरस्कार : अध्यक्ष, आमदार मोहनराव कदम

सांगली : भारतीय शुगर यांच्याकडून वांगी येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाला बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लॅट पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १० फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील हॉटेल सयाजी येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. गेल्या दोन वर्षामध्ये कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कोजनरेशन प्रकल्पाचा सलग दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी दिली.

भारतीय शुगर ही देशपातळीवर नावाजलेली संस्था आहे. ती देश पातळीवरील, राज्य पातळीवरील सहकारी व खासगी साखर कारखान्यांअंतर्गत विविध प्रकल्पांच्या कामकाजाचा आढावा घेऊन, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकल्पांना पुरस्कार देते. सोनहिरा कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्प उत्कृष्ट कार्यक्षमतेने चालविण्याचे व्यवस्थापन को जन मॅनेजर नवनाथ सपकाळ यांनी केले. त्यांना कार्यकारी संचालक शरद कदम यांनी मार्गदर्शन केले आहे. कारखान्याच्या या प्लांटला राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लॅट पुरस्कार, बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लॅट विशेष, बेस्ट कोजनरेशन मॅनेजर, बेस्ट डी.एम. प्लॅट मॅनेजर आणि यंदा भारतीय शुगरकडून बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कोजनरेशन प्लॅट पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here