पुणे : राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मध्य विभागातील उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनासाठी प्रथम क्रमांकाचा व सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात करण्यात आला. ‘व्हीएसआय’च्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यातील साखर कारखान्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे-पाटील, संचालक देवदत्त निकम, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, टेक्नीकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, राजेश वाकचौरे, दिलीप कुरकुटे, विकास टेंगले यांनी पुरस्कार स्वीकारला.
साखर कारखान्याने प्रती क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च, एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळत्या भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी राखला आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने हा पुरस्कार मिळाला आहे. गाळप क्षमतेचा योग्य वापर करून बगॅस बचत, देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला. पुरस्कारासाठी संस्थापक व सहकार मंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, असे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे-पाटील यांनी सांगितले.