मुंबई : प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट आयटी रिटर्न संदेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून आय टी रिटर्न भरणाऱ्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. हे गुन्हेगार अधिकारी असल्याचे भासवून बँक खात्याचा तपशील काढत असल्याचे समोर आले आहे. हे गुन्हेगार ग्राहकांना फसवण्यासाठी बनावट एसएमएस वापरत आहेत.
या द्वारे करदात्यांना संदेश पाठवला जातो. त्यांच्याकडे विशिष्ट कर परतावा आहे आणि लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असे या संदेशााद्वारे सांगितले जाते. तसेच ग्राहकांना एका विशिष्ट दुव्यावर योग्य खाते क्रमांक पाठविण्यास सांगितले जाते.
आयटी विभागाने ग्राहकांना अशा मेसेजेस व ईमेलच्या विरोधात बर्याच वेळा सतर्क केले आहे. आयटी विभाग कधीही ई-मेल, एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे क्रेडिट / डेबिट कार्ड, बँका किंवा इतर वित्तीय खात्यांशी संबंधित माहितीसाठी पिन, ओटीपी, संकेतशब्द किंवा तत्सम प्रवेश माहिती विचारत नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.