भैरव बायोफ्युएल इथेनॉल उत्पादनासाठी मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील गुऱ्ह तालुक्यातील आम्रदंडी येथे १३० केएलपीडी क्षमतेचे धान्यावर आधारित डिस्टिलरी युनिट स्थापन करणार आहे. या युनिटमध्ये दोन मेगावॅटचा सहवीज निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येणार आहे.
याबाबत प्रोजेक्ट्स टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रस्तावित युनिटची उभारणी ६०.३९ एकर जागेवर करण्यात येईल. या युनिटमधून जवळपास ३०० लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे. भैरव बायोफ्युएल्सला या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरीची (EC) प्रतीक्षा आहे. कंपनीला सप्टेंबर २०२४ मध्ये या युनिटच्या पुर्णत्वासह Q३/FY२४ मध्ये प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षा आहे.