सोलापूर : द डेक्कन शुगर असोसिएशन (इंडिया) च्या वतीने भैरवनाथ शुगरचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन एस. एस. शिरगावकर, अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस.डी. भोकरे, उपाध्यक्ष एम.के. पटेल, कार्यकारी सचिव गौरी पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत, व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भैरवनाथ शुगर आलेगावचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यांच्यासह संचालक, सभासद उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुन्ना साठे, प्रवीण लटके, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सत्यम लोंढे, अतुल खुपसे, महेश मोहोळे, युवा सेनेचे स्वप्नील खरात, नाना शेलार, सचिन भंडारी, युवराज वसगडेकर यांच्यासह अनेकांनी पुरस्काराबद्दल कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला.