मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम संपवणे सुरु केले आहे. सर्वप्रथम भैसाना कारखान्याने सोमवारी सकाळी गाळप हंगाम संपवला. टिकौला, खाईखेड़ी आणि रोहाना कारखाने दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. खतौली, मंसूरपुर आणि मोरना मध्ये ऊस गाळप जून महिन्यापर्यंत होईल.
जिल्हयामध्ये टिकौला, खाईखेडी, रोहाना कारखान्यांनी आपले वजन सेंटर बंद केले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ऊस राहिला आहे ते थेट कारखान्याला ऊस घालत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी डॉ आर डी द्विवेदी यांनी सांगितले की, हे साखर कारखाने अजून दोन दिवस चालण्याची शक्यता आहे. तितावी साखर कारखाना 31 मे पर्यंत चालू शकतो. खतौली, मंसूरपुर आणि मोरना यांचा गाळप हंगाम जून पर्यंत संपेल. यावेळी 10 जून पर्यंत ऊस गाळप होऊ शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.