ऊन साखर कारखान्यावर भारतीय किसान युनियनच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ऊस थकबाकी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. भारतीय किसान युनियनच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी आणि शेतकऱ्यांनी ऊन कारखान्याच्या सुपिरिअर फुडग्रेन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गेटवर आंदोलन केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखाना डिस्टिलरी उभारत आहे. राणा ग्रुपच्या इतर साखर कारखान्यांकडून ऊस बिले अदा करण्यात आली आहेत. मात्र येथे शेतकऱ्यांना पैसे दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी कारखान्याचे युनिट प्रमुख अवनीश कुमार, ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया हे शेतकऱ्यांमध्ये पोहोचले. त्यांनी ५ सप्टेंबर रोजी १५ दिवसांची बिले देण्यात येतील. तसेच दर १५ दिवसांनी तेवढीच बिले देण्यात येतील असे आश्वासन दिले.
साखर कारखान्याकडून १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व ऊस बिले अदा केली जातील असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर धरणे आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी बतीसा खापचे चौधरी शौकिंद्र सिंह, देवेंद्र सिंह मंत्री, देवराज पहिलवान, सुरेश पाल, राजवीर, हरेंद्र प्रधान, जितेंद्र चेयरमन, देवेंद्र प्रधान गागोर, रविंद्र पवार, गुड्डू बनत, रविंद्र मुंडेट आदी उपस्थित होते.