हापूड : भारतीय किसान युनियन संघर्षच्या शिष्टमंडळाने लखनौमध्ये जिल्ह्याचे प्रभारी मंत्री कपिलदेव अग्रवाल यांची भेट घेतली. साखर कारखान्याची दिवाळखोरी रोखावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या इतर समस्याही त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. त्याची सोडवणूक तातडीने केली जाईल असे आश्वासन मंत्र्यांनी भाकियूच्या शिष्टमंडळाला दिले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरनजीत सिंह गुर्जर यांनी सांगितले की, सिंभावली साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज वसुलीसाठी भारतीय स्टेट बँक, पीएनबीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पीएनबीने यातून माघार घेतली आहे. शेतकऱ्यांचे २६० कोटी रुपये थकीत आहेत. जर भारतीय स्टेट बँकेच्या बाजूने निर्णय झाल्यास, कारखाना दिवाळखोर घोषित होईल. आणि बँकेकडून आपले पैसे वसूल केले जातील. त्यामुळे शेतकरी आपल्या पैशापासून वंचित राहतील.
याशिवाय, वीज कपात, कुपनलिकांना बसवलेले वीज मीटर, मोकाट जनावरे आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले. मंत्र्यांनी याबाबत जिल्हाधिकारी प्रेरणा शर्मा यांना फोनवरून याबाबत सूचना दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष इरकान चौधरी, डॉ. राजेश चौहान, आदेश प्रधान, रोहित मोरल, गजेंद्र चौहान आदी उपस्थित होते.