साखर कारखान्यांविरोधात भाकियूचे एक जूनपासून आंदोलन

हापुड : सिंभावली आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी बियाणे, खते आदी उधार न दिल्याविरोधात भाकियू्च्या मासिक पंचायतीमध्ये एक जूनपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांची प्रलंबित ऊस बिले आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

भाकियूचे जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा यांनी सांगितले की, अनुपशहर धरणात पाणी असूनही ते कालव्यांतून सोडले जात नाही. सध्या शेतकऱ्यांना ऊस आणि भात पिकासाठी पाण्याची अत्यंतिक गरज आहे. सिंभावनी आणि ब्रजनाथपूर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना बिनव्याजी बियाणे, खते, किटकनाशके, औषधे दिली जात नाहीत. याविरोधात एक जूनपासून सिंभावली कारखान्याविरोधात शेतकरी आंदोलन करतील.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विभाग अध्यक्ष परमजित सिंह म्हटले की अडत्यांकडून शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना एक किलो अतिरिक्त व अडीच टक्के अडत कपात केली जात आहे. अनेक गावांत शेतकऱ्यांना भरपाई देण्याआधीच वीज खांब रोवले जात आहेत. शासनाच्या आदेशावर शेतकरी सन्मान निधीचे पैसे परत घेतले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर जमा केलेले पैसे परत घेणे गैर आहे. त्या मुद्यांची सोडवणूक करणेही गरजेचे आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा, मुकेश मुखिया, देवेंद्र त्यागी, बालूराम, राजवीर सिंह, सचिन शर्मा, दिनेश त्यागी, बबली सिंह, नीलम त्यागी, गुजराल सिंह, अनिल त्यागी, जीते चौहान, शोभाराम आर्य, हरीश त्यागी, श्याम सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here