सोलन : हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्ह्यात भारत स्पिरिट्सच्यावतीने इथेनॉल उत्पादन प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीने आपला प्रस्ताव तयार केला आहे. या युनिटची उत्पादन क्षमता २०० klpd असेल. या योजनेमधून ४.५ मेगावॅट विजेचे सह उत्पादन यंत्रणेचाही समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले.
प्रोजेक्ट्स टुडेकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, भारत स्पिरिट्स कंपनीच्या या योजनेसाठी पर्यावरण मंजूरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या प्लांटचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.