ऊस दर ४५० रुपये क्विंटल करण्याची भारतीय किसान मजदूर संघाची मागणी

पिलीभीत : ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करावी तसेच ऊस बिलांची थकबाकी त्वरीत मिळावी, साखर कारखान्यांनी थकबाकीवरील व्याज द्यावे अशी मागणी करत राष्ट्रीय किसान मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी पूरनपूरमध्ये पदयात्रा काढली. बिसलपूरमध्ये निदर्शने करत निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी सर्व तहसील कार्यालयांमध्ये निवेदन देण्याचे आवाहन केले होते. बिसलपूरमध्ये कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी एक तास आंदोलन करून नंतर राज्यपालांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी आर. के. राजवंशी यांना दिले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, ऊस दर ४५० रुपये प्रती क्विंटल करावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, ऊसाची बिले १५ दिवसांत दिली जावीत, पेट्रोलियम पदार्थ्यांच्या किमती कमी कराव्यात अशा विविध मागण्या करण्यात आल्या. मंडल संयोजक गुल्लू पहलवान यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यावेळी प्रेमसागर पटेल, अंग्रेज सिंह, कुलविंदर सिंह, अरविंद कुमार, प्यारेलाल, आणि गुरुजंट सिंह आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पूरनपूरमध्ये युवा तहसील अध्यक्ष गुरप्रीत सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचलले. तेथे निवेदन देण्यात आले. यावेळी अनंत अग्रवाल, गुरविंदर सिंह, हाजी मझले, प्रभजोत सिंह, जसपाल सिंह, प्रीतपाल सिंह, सेवाराम, कुलवंत सिंह, करमवीर सिंह, सतविंदर सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here