शामली : पुढील गळीत हंगामात उसाला ४५० रुपये क्विंटल दर द्यावा आणि थकीत बिलांची वसुली तातडीने करावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी रविंद्र सिंह यांना सादर केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामात उसाला साडेचारशे रुपये क्विंटल दर मिळावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना उसाची थकीत बिले मिळावीत, राज्य सरकारने शेतीसाठी मोफत विज पुरवावी असे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने निवडणुकीच्या घोषणापत्रात असे आश्वासन दिले होते, याची आठवण शेतकऱ्यांनी करून दिली. अती पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला. यावेळी संघटनेचे जिल्हा मंत्री देशराज शर्मा, रामपाल सिंह, कुंवरबीर सिंह, प्रदीप कुमार, प्रदीप मुखिया, नाथुराम, बाबीता आदी उपस्थित होते.