सांगली : भारती शुगर ॲण्ड फ्युअल्स प्रा.ली. नागेवाडी (ता. खानापूर) तर्फे यंदा तीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड यांनी दिली.
गळीत हंगाम २०२३-२४ च्या अनुषंगाने तोडणी – वाहतुक ठेकेदार यांचा करार तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्या झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. ही बैठक कारखाना कार्यस्थळावर झाली. लाड म्हणाले, साखर कारखाना व्यवस्थापनाने २०२३-२४ च्या गाळप हंगामाची तयारी केली आहे. कारखान्याकडे ६१०० हेक्टर उसाची नोंद झाली असून १०० ट्रॅक्टर, १७५ अंगद व ७५ बैलगाडीचे करार झालेले आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व ठेकेदारांना करारापोटी पहिला हप्ता अदा करण्यात आला आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेती विभागीय कार्यालयात उसाच्या नोंदी कराव्यात अथवा कारखाना मुख्य कार्यालयाशी संपर्क करुन नोंदी करण्याचे आवाहन महेंद्र लाड यांनी केले.