सांगली : गाळप हंगामासाठी कारखान्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त उसाची नोंद झाली आहे. ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन पूर्ण झाले आहे. यंदा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर देण्यासाठी ‘भारती शुगर्स’ मागे राहणार नाही. शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता भारती शुगर्ससाठी ऊस राखून ठेवावा, असे आवाहन चेअरमन ऋषिकेश लाड यांनी केले.
भारती शुगर्स अॅण्ड फ्युअल्स प्रा. लि. नागेवाडीचा (यशवंत शुगर्स) गळीत हंगाम २०२३ २४ चा बॉयलर अग्निप्रदीपन चेअरमन ऋषिकेश लाड यांच्या हस्ते तर बॉयलर, होम हवन पूजा कारखान्याचे कर्मचारी बापू पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते झाली. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी शंकरनाना मोहिते, मारुती तामखेडे, रामभाऊ देवकर, आकाश साळुंखे, अजितकुमार मोहिते, चंद्रकांत चव्हाण, सतीश निकम, भानुदास निकम, सुब्राव निकम, श्रीमती इंदुमती जाधव, प्रदीप कदम, अर्जुन कणसे, सुभाष कणसे, मधुकर सावंत, जवाहर यादव, पांडुरंग माने, प्रकाश पवार, एकनाथ घाडगे, राजेंद्र पाटील, प्रकाश माने, मोहन बाबर, महेश राजमाने, दिनकर जाधव, राजू पठाण, धनाजी पाटील, राम मदने, रघुनाथ जगताप, अंकुश निकम आदी उपस्थित होते.
यावेळी भारती शुगर्सचे वर्क्स मॅनेजर प्रकाश तुपे, मुख्य शेती अधिकारी अतुल नाईकनवरे, फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर, चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी, श्रीपती शुगर्सचे महेश जोशी, संतोष जगताप, प्रसाद गोकावे, सर्व उपखाते प्रमुख व कर्मचारी कामगार उपस्थित होते.