भीमा कारखाना सभासदांसाठी २० रुपये प्रती किलोने साखर देणार

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील कै. भीमरावदादा महाडिक साखर कारखान्याकडून सभासद शेतकऱ्यांना प्रती किलो २० रुपये अशा सवलतीच्या दरात साखर वाटप सुरू करण्यात येणार आहे. कारखान्याच्यावतीने दरवर्षी प्रमाणे दिवाळीसाठी ही सवलत योजना सुरू करण्यात आल्याची माहिती चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली.

चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सांगितले की, सभासदांना साखर घेऊन जाणे आणि कर्मचाऱ्यांना वितरण सोपे जावे यासाठी प्रथमच कारखान्याने खास सभासदांसाठी २५ किलो साखर बॅगचे पॅकिंग केले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गट ऑफिसवर १८ ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सभासदांच्या साखरेचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, कारखान्याच्यावतीने सभासदांसोबत मत सभासदांच्या वारसांनादेखील दिवाळी साखर वाटप केली जाईल. सर्वच सभासदांनी गट ऑफिसवरून घेऊन जाण्याचे आवाहन चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक अधिकारी, पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here