लोणी शाळेला कमानीसाठी भीमाशंकर कारखान्याकडून ४ लाख रुपयांची मदत

पुणे : लोणी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेसाठी भीमाशंकर साखर कारखाना (पारगाव दत्तात्रयनगर) यांच्या वतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून स्वागत कमान मंजूर करण्यात आली आहे. भीमाशंकर कारखाना भाग निधीतून ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वागत कमानीचे भूमिपूजन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांच्या हस्ते व गृहविभागाचे उपसचिव डॉ. कैलासराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

याप्रसंगी अशोक आदक, वामनराव जाधव, अनिता भूमकर, राहुल भागवत, किसनराव गायकवाड, सरपंच उर्मिला धुमाळ, चंद्रकला वाळुंज, सागर थोरात, माजी सरपंच उद्धवराव लंके, अमित वाळुंज, शिक्षक शंकर कदम, बाळासाहेब वाळुंज, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळशिराम वाळुंज, उपाध्यक्ष गीतांजली लंके, मुख्याधापक नितीन आढाव, अनिल खोमणे, राजश्री मोटे उपस्थित होते. राजेश ढोबळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here