कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणींतून वाटचाल करीत असला तरी सभासद आणि कारखान्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांना विश्वासात घेऊन कारभार करीत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेइतके गाळप झाले. यंदाच्या हंगामात सहा लाखाचा टप्पा ओलांडायचा आहे. हे उद्दिष्ट सभासद आणि हितचिंतकांच्या पाठबळावर पूर्ण होईल. सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. कारखान्याच्या ६६ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, संचालक मंडळ कारखान्याच्या हिताचेच धोरण ठेवून निर्णय घेत असतानाच उत्पादक सभासद, ऊस तोडणी, ओढणी कामगारांसह कारखान्याच्या कामगारांच्या सहकार्याने वाटचाल करीत आहे. ज्येष्ठ संचालक केरबा पाटील म्हणाले, सभासद आणि कामगारांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहोत. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, राधानगरीच्या माजी सभापती वालुबाई पाटील आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.