कोल्हापूर : भोगावती साखर कारखाना भोगावती खोऱ्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, कारखाना आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असला तरी लवकरच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी केले. सडोली खालसा (ता. करवीर) येथे भोगावती कारखान्याच्या संपर्क सभेत ते मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी बळवंत साळुंखे हे होते.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शैलजा कुरणे, बळवंत साळुंखे, प्रा. निवास साळुंखे आदींची भाषणे झाली. उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक मंडळ, सरपंच अमित पाटील, शंकर पाटील, सखाराम पाटील, विलास शेलार, डी. के. पाटील, मारुतराव साळोखे, शैलजा कुरणे, रंगराव चव्हाण, बी. वाय. पाटील, विलास चव्हाण, एम. डी. निचिते, विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते. स्वागत संचालक अक्षय पवार पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रा. पवन पाटील यांनी केले.