भोरमदेव सहकारी साखर कारखान्यात राज्यातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या इथेनॉल प्लांटची उभारणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली. त्यांनी कृषी आधारित इथेनॉल प्लांटच्या निर्मितीच्या कामात गती आणण्याचे निर्देश दिले. यावेळी एनकेजे बायो फ्लुएलच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आगामी नववर्षापर्यंत याच्या उभारणीचे काम पूर्ण होईल. छत्तीसगढ सरकार कबीरधाम जिल्ह्यात राज्यातील सर्वात मोठा आणि पहिला इथेनॉल प्लांट स्थापन करीत आहे. शेतीवर आधारित इथेनॉल प्लांटला भुपेश सरकारने प्राधान्य दिले आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार भोरमदेव सहकारी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक भुपेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, पीपीपी मॉडेलनुसार, (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) स्थापन केला जाणारा हा देशातील पहिला इथेनॉल प्लांट आहे. इथेनॉल प्लांट हायब्रिड टेक्नोलॉजीने तयार होईल. त्याचे गाळप थेट उसाचा रस आणि ऑफ सिझनमध्ये मोलॅसीस वापरून केले जाईल. यासाठी भोरमदेव सहकारी साखर कारखान्याची रिक्त ३५ एकर जमीन देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत. यासाठी भोरमदेव कारखाना आणि छत्तीसगढ डिस्टलरी लिमिटेडची सहाय्यक युनिट एनकेजे बायोफ्युएल लिमिटेडमध्ये करार करण्यात आला आहे.