भारताच्या साखर निर्यात निर्बंधामुळे भुतानमधील उद्योग चिंतीत

थिम्पू : भारताने २४ मे रोजी एक अधिसूचना जारी करून साखर निर्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात मर्यादीत केली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, ३१ ऑक्टोबर २०२२ पासून अथवा पुढील आदेशापर्यंत साखर निर्यात केवळ साखर महासंचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (DFPD), ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या खास परवानगीनेच करता येईल. भारताकडून जारी करण्यात आलेल्या निर्यात निर्बंधामुळे भुतानमधील उद्योग चिंतेत आहेत. भूतानमध्ये जवळपास नऊ शीतपेय, बेव्हरेज, भोजन, कृषी उद्योग आहेत. ते साखरेचा कच्चा माल म्हणून वापर करतात. या उद्योगात जवळपास १२०० कर्मचारी काम करतात. जर भारताचे निर्बंध भुतानवर लागू झाले तर स्थिती बिघडेल अशी शक्यता या उद्योगात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

द नॅशनल थालयंडमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिग कोला, शितपेय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समत्से जामयांग चोदा यांनी सांगितेल की, निर्बंधाबाबतची अधिसूचना स्पष्ट नाही. मात्र, हा निर्णय जर भुतानला लागू झाला तर आम्हाला आमची कंपनी बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल. अशा पद्धतीने बेव्हरेज कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे साखर हा प्राथमिक कच्चा माल आहे. त्याची आयात बंद झाल्यास कामकाज बंद होईल. भुतानच्या आर्थिक व्यवहारांचे मंत्री लोकेश शर्मा यांनी सांगितले की, भारताच्या निर्यात निर्बंधांचा देशाला फटका बसणार आहे. आम्ही साखरेचे उत्पादन करीत नाही. साखरेसाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहोत. भारत सरकार आधी आमचा विचार करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here