बिद्री साखर कारखान्यात पुन्हा के.पी.पाटलांचीच सत्ता

 कोल्हापूर :  कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. के. पी. पाटील हे मतमोजणी केंद्रावर दाखल होताच त्यांच्यावर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

कारखान्याचे राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे.  . सायंकाळी सहापर्यंत पहिल्या टप्प्याचे मतमोजणी पूर्ण झाली असून मतदारांनी यंदा देखील सत्ताधाऱ्यांना आपला कौल देत बिद्रीच्या चाव्या पुन्हा के. पी. पाटील यांच्याकडेच सोप्ल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. विरोधी गटात असलेल्या ए. वाय. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार प्रचार करत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. मात्र मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि ए. वाय. पाटील यांच्या परिवर्तन आघाडीचे मनसुबे धुळीस मिळवले.

सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी दरम्यान परिवर्तन आघाडीचे नेते ए. वाय. पाटील यांनी मतमोजणी केंद्रात हजेरी लावून परिस्थिती पाहत होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या बाजूने कौल दिसू लागल्यानंतर ए. वाय. पाटील यांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. सत्ताधारी के. पी. पाटील गटाला पहिल्या फेरीत सरासरी ४५९९ आघाडी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here