कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार के. पी. पाटील यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात विशेष सभेत निवडी पार पडल्या. यावेळी उपाध्यक्षपदी गणपतराव फराकटे (बोरवडे) यांची निवड करण्यात आली. सभासदांनी मोठ्या मताधिक्याने निवडून देत आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. नूतन संचालक मंडळ व प्रशासनाच्या सहकार्याने ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देऊ. सभासदांचा विश्वासाला जपण्याचा प्रयत्न करू, असे नूतन अध्यक्ष पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.
अध्यक्षपदी के. पी. पाटील यांची निवड निश्चित होती. उपाध्यक्षपदासाठी गणपतराव फराकटे यांचे नाव नेत्यांनी सुचविले. उपाध्यक्षपदाचे नाव असलेले बंद पाकीट जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, नविद मुश्रीफ हे घेवून सभास्थळी घेऊन आले. याला उपस्थित संचालकांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी संचालक राजेंद्र पाटील, संभाजी पाटील, पंडित केणे, डी. एस. पाटील, राजेंद्र मोरे, राजेंद्र भाटळे, उमेश भोईटे, दीपक किल्लेदार, सुनील सूर्यवंशी, रणजित मुडुकशिवाले, प्रवीणसिंह पाटील, रंगराव पाटील, रवींद्र पाटील, मधुकर देसाई, राहुल देसाई, धनाजी देसाई, सत्यजित जाधव, केरबा पाटील, संभाजी पाटील, रंजना पाटील, क्रांती ऊर्फ अरुंधती पाटील, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
बिद्री कारखान्याचा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रति टन ३४०७ रुपये दर जाहीर