बिद्री साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता

कोल्हापूर : पावसामुळे जून महिन्यात स्थगित करण्यात आलेली येथील श्री दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप सरकारी स्तरावरून अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. निवडणुकीबाबत योग्य वेळी कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.

गेले वर्षभर बिद्री कारखान्याची निवडणूक रखडली आहे. मार्च – एप्रिल महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र, पावसाच्या शक्यतेने ३० सप्टेंबरनंतर निवडणूक घेण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे एक ऑक्टोबरनंतर निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीबाबत एक कार्यक्रम व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरील निवडणूक कार्यक्रमामुळे कार्यक्षेत्रात उलट- सुलट चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत कार्यक्रम प्रसिद्ध केलेला नाही. योग्य वेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असे निवडणूक विभागाने सांगितले. सद्यस्थितीत अधिकृत निवडणूक कार्यक्रम आमच्याकडे आलेला नाही, असे बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here