बिद्री साखर कारखाना यंदा ११ लाख टन ऊस गाळप करणार : अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगाम व डिस्टिलरी प्रकल्पाच्या बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. कारखाना नेहमी सातत्याने उच्चांकी ऊसदर देण्यात नेहमी अग्रेसर आहे. हीच परंपरा कायम ठेवून चालू गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासह उच्चांकी उतारा व ऊसदराचे उद्दिष्ट पूर्ण करूया, असे आवाहन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले. यावेळी संचालक सुनीलराज सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी नीताराणी सूर्यवंशी यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन करण्यात आले. डिस्टिलरी विभागाकडील बॉयलरचे अग्निप्रदीपन संचालक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी निर्मला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

के. पी. पाटील म्हणाले की, बिद्री’च्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. साखर कारखानदारीवर वेळोवेळी आलेल्या संकटांशी सामना त्यांनी यशस्वीरीत्या केला आहे. कामगारांना बोनससह अन्य आर्थिक सुविधा देत सन्मान केला आहे. रोजंदारी कामगारांचा प्रश्न लवकरच निकाली निघेल. कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत केले. प्रवीणसिंह पाटील, धनाजीराव देसाई, पंडितराव केणे, डी. एस. पाटील, सत्यजित जाधव, राहुल देसाई, राजेंद्र मोरे, रंगराव पाटील, मनोज फराकटे, दीपक किल्लेदार, रवींद्र पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र भाटले, रणजित मुडुकशिवाले, फिरोजखान पाटील, रामचंद्र कांबळे, फत्तेसिंग पाटील, रावसाहेब खिलारी, क्रांती ऊर्फ अरुंधती संदीप पाटील, रंजना आप्पासो पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here