बिद्री साखर कारखाना दररोज आठ हजार टन ऊस गाळप करणार : कार्यकारी संचालक के. एस. चौगले

कोल्हापूर : बिद्री साखर कारखाना चालू गळीत हंगामात प्रती दिन साडेसात ते आठ हजार टन ऊस गाळप करणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक मशिनरींनी कारखाना सुसज्ज करण्यात आला आहे. यंदाच्या गळीत हंगामात जवळपास ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे,’ असे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. बिद्री येथे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

कार्यकारी संचालक चौगले म्हणाले, ‘चालू गळीत हंगामासाठी जवळपास १२५० लहान- मोठ्या वाहनांचे वाहतुकीसाठी करार केले आहेत. येत्या काही दिवसांत गाळपास प्रारंभ केला जाणार आहे. सभासदांनी पिकविलेला सर्व सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे.’ कार्यक्रमात संचालक आर. के. मोरे व त्यांच्या पत्नी कल्पना मोरे यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन झाले. संचालक दीपक किल्लेदार यांच्या हस्ते ऊस तोडणीचा प्रारंभ तर संचालक उमेश भोईटे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. सर्व संचालक व अधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमास सर्व संचालक, आर. डी. देसाई यांच्यासह आजी-माजी संचालक, तोडणी वाहतूक कंत्राटदार, ट्रक, ट्रॅक्टरचालक वाहक, तोडणी, वाहतूक कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here