बीड: चीनी मंडी
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी कारखाना प्रशासनाच्या दक्षतेमुळे आग काही वेळातच आटोक्यात आणण्यात आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा हा साखर कारखाना आहे. याच कारखान्यात दोन वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये झालेल्या एका अपघातात ७ कर्मचारी दगावले होते.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या साठवण भागात अचानक आग लागली. तेथे ठेवलेल्या उसाच्या चिपाडांसह, बगॅसवर कन्व्हेयर बेल्टमध्ये घर्षण होऊन त्यातून निघालेल्या ठिणग्या पडल्या असाव्यात. त्यासह उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लगेच फैलावली. आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी ती कन्व्हेयर बेल्टपर्यंत पसरली होती. आग विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. पुढील को-जनरेशनपर्यंत जाण्याआधीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला. परळी थर्मल, गंगाखेड शुगर, माजलगाव शुगर या कारखान्यांसह गंगाखेड, सोनपेठ, धारुर, अंबाजोगाई या नगरपालिकांच्या एकूण नऊ अग्निशामक बंबांनी आग आटोक्यात आणली. आगीत कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp