नवी दिल्ली : देशभरात चालू पिक वर्ष २०२२-२३ (जुलै-जून) मध्ये रब्बी हंगामात आतापर्यंत गव्हाच्या लागवड क्षेत्रात किरकोळ वाढ होवून ते ३४१.१३ लाख हेक्टर झाले आहे. कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. रब्बी हंगामातील मुख्य पिक असलेल्या गव्हाची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू झाली होती. मक्का, ज्वारी, हरभरा, मोहरीचाही इतर रब्बी पिकांचा समावेश आहे. या पिकांची मार्च-एप्रिलपासून कापणी होईल. ताज्या आकडेवारीनुसार सध्याच्या रब्बी हंगामात २० जानेवारीपर्यंत गव्हाचे लागवड क्षेत्र ३४१.१३ लाख हेक्टर झाले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत हे क्षेत्र ३३९.८७ लाख हेक्टर होते. लागवडीचे जादा क्षेत्र मुख्यत्वे राजस्थान (२.५२ लाख हेक्टर), बिहार (१.४९ लाख हेक्टर), महाराष्ट्र (०.९२ लाख हेक्टर), छत्तीसगढ (०.५४ लाख हेक्टर), गुजरात (०.४८) लाख हेक्टर आणि उत्तर प्रदेश (०.२२ लाख हेक्टर) यामध्ये आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, गव्हाच्या पेरणीचे कमी क्षेत्र मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये आहे. मिळालेल्या आकडेवारीवरुन भाताचे लागवड क्षेत्रही एक वर्षाच्या २३.६४ लाख हेक्टरच्या तुलनेत वाढून ३२.५४ लाख हेक्टर झाले आहे. डाळींच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली असून ते १६३.७ लाख हेक्टरवरून १६४.१२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. अशाच प्रकारे मोहरीचे लागवड क्षेत्र ९०.१८ लाख हेक्टरवरुन ९८.१ लाख हेक्टरवर गेले. या वर्षीच्या रब्बी हंगामात २० जानेवारीपर्यंत रब्बी पिकांचे क्षेत्र ६९६.३५ लाख हेक्टर आहे. एक वर्षापूर्वी ते ६७६.९७ लाख हेक्टर होते.