नवी दिल्ली : कोरोना व्हायरसची नवी लाट रोखण्यासाठी देशभरात अंशतः लॉकडाउन करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, असे झाल्यास कामगार आणि मालाच्या ये-जा करण्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम औद्योगिक उत्पादनावर होईल अशी शक्यता उद्योग जगताने वर्तविली आहे. उद्योजकांची संघटना सीआयआयच्यावतने कंपन्यांच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) चर्चेतून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून काही उपाय सुचविण्यात आले आहेत. कोविड कर्फ्यू आणि कोरोनाचा फैलाव असलेल्या ठिकाणी सूक्ष्म नियंत्रणासाठी रणनीती आखली जावी. संक्रमण रोखण्यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे या उपायांवर भर देण्याची गरज असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यातूनच आपण कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवू शकतो असे सर्व्हेत म्हटले आहे.
दळणवळणावर परिणाम
सीआयआयच्या सर्व्हेत सहभागी बहुसंख्य सीईओंनी सांगितले की, अंतशः लॉकडाऊन लागू झाल्यास कामगारांसोबत कच्चा माल, उत्पादनांच्या दळणवळणावर परिणाम होऊ शकतो. औद्योगिक उत्पादनांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकेल. अंशतः लॉकडाउनच्या काळात कामगारांच्या ये-जा करण्यावर निर्बंध येऊ शकतात. परिणामी उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती सर्व्हेमध्ये सहभागी सीईओंनी व्यक्त केली.
उत्पादनांचे नुकसान शक्य
जर वस्तू, कच्च्या मालाच्या दळणवळणात अडचणी आल्या तर उत्पादनांचे ५० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते असे ५६ टक्के सीईओंचे म्हणणए आहे. सीआयआयचे मानद अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन यांनी सांगितले की