पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रामनगर पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांनी छापा टाकून सुमारे ५ हजार लिटर इथेनॉल जप्त केले. पोलिसांनी पालिया गावातून एक टँकर, एक बोलेरो आणि ३१ ड्रममध्ये ठेवलेले इथेनॉल जप्त केले. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यात गया जिल्ह्यातील शिवानंदन प्रसाद, महेश यादव आणि रामनगरच्या राजकिशोर साह यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक सुशांत कुमार सरोज यांच्या सूचनेनुसार एसडीपीओ नंदजी प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला. त्यांच्यासोबत पोलिस स्थानकाचे प्रभारी लालन कुमार आणि इतर पोलिस उपस्थित होते. संशयितांनी इथेनॉल इतर विविध पदार्थांमध्ये मिसळून पेट्रोल तयार करण्यासाठी वापरले. मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा अवैध व्यापार रोखण्यासाठी ही कारवाई केल्याचे एसडीपीओ नंदजी प्रसाद यांनी सांगितले.