बगहा : मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पश्चिम चंपारण्यमध्ये प्रगती यात्रेला प्रारंभ केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना ऊस दरात प्रती क्विंटल २० रुपये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. त्यांनी जिल्ह्यासाठी ७८१ कोटी रुपयांच्या योजनांची भेट देताना उसाच्या भावात प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ जाहीर करून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.
नितीशकुमार म्हणाले की, नुकतीच उसाच्या भावात प्रती क्विंटल १० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता त्यात प्रतिक्विंटल आणखी १० रुपयांनी वाढ होणार आहे. उत्तर बिहारला उत्तर प्रदेशशी जोडणारा बहुप्रतिक्षित मदनपूर-पनियाहवा रस्ता बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा रस्ता बागाहा पोलीस जिल्ह्यातील मदनपूर ते उत्तर प्रदेशातील पनियाहवापर्यंत वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून सहा किलोमीटरमध्ये बांधला जाणार आहे. त्यामुळे उत्तर बिहार आणि नेपाळ थेट यूपीशी जोडले जातील.