पाटणा : साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वीज, इथेनॉल, खत आदींच्या नफ्यातील अर्धा हिस्सा देण्याची मागणी बिहार राज्य ऊस उत्पादक संघाने केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून विविध कारणांनी केली जाणारी कपात बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
बिहार राज्य ऊस उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाने रविवारी ऊस विकास मंत्री आलोक मेहता यांची भेट घेतली. ऑल इंडिया शुगरकेन फार्मर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. रवींद्रन, सरचिटणीस नंदकिशोर शुक्ला, बिहार राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष लालन चौधरी, बिहार राज्य ऊस उत्पादक संघाचे सरचिटणीस प्रभुराज नारायण राव, कोषाध्यक्ष अरुण कुमार यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले की, मंत्री आलोक मेहता यांच्याकडे रीगा आणि सासामुसा साखर कारखाना लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली. उसाच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाकडून मदत निधीची व्यवस्था करण्याचे आश्वासन मंत्री मेहता यांनी दिले आहे.