बंगळुरू/पाटणा : देशातील ऐतिहासिक साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या रिगा साखर कारखान्याला अनेक वर्षांनंतर नवीन मालक मिळाला आहे. कर्नाटकस्थित निरानी शुगर्स लिमिटेडने रिगा शुगर कंपनी लिमिटेडचे यशस्वीपणे अधिग्रहण केले. या अधिग्रहित सुविधांमध्ये ५,००० टीसीडी (दररोज प्रती टन ऊस गाळप क्षमता), ४५ केएलपीडी (किलो लिटर प्रतिदिन)ची डिस्टिलरी क्षमता आणि ११ मेगावॅट क्षमतेचा सह-वीज उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे.
यावेळी ई-लिलावाची राखीव किंमत घटवून ८६.५० कोटी रुपये करण्यात आली. रिगा शुगर कंपनी लिमिटेडचे लिक्विडेटर नीरज जैन यांनी याबाबतची जाहीर नोटीस नुकतीच जारी केली होती. अलिकडेच निरानी शुगर्सच्या एका टीमने स्थानिक कर्मचारी आणि तांत्रिक तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. कारखान्याची पाहणी केली. निराणी शुगर्स भारतातील सर्वात मोठ्या कृषी-वस्तू व्यवसायातील एक प्रमुख घटक आहे. ते भारतीय साखर उद्योगातील अव्वल घटकांपैकी एक आहे. हे अधिग्रहण निरानी शुगर्स लिमिटेडच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रातील उपस्थिती वाढवण्यासाठी, शाश्वत आणि वैविध्यपूर्ण वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यातून शेतकऱ्यांना लाभ आणि ग्रामीण समुदायाच्या विकासाला समर्थन देणाऱ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळणार आहे.