पटना: मोतिहारी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारचे ऊस खात्याचे मंत्री प्रमोद कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी आणि कामगारांचे पैसे देण्यासाठी कारखान्यांनी मालमत्ता विक्री करावी. त्यासाठी मालमत्तेचा आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत.
ऊस विभागाचे मंत्री यांनी मोतिहारी साखर कारखान्याची थकीत देणी आणि त्याच्या मालमत्तेविषयी १५ दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. साखर कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील असे त्यांनी सांगितले.
न्यूजक्लिक या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, मोतिहारीमधून आमदार प्रमोद कुमार यांनी स्पष्ट सांगितले आहे की, कारखाना पुन्हा सुरू करणे शक्य नाही. विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी अलीकडेच जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत बंद मोतिहारी कारखाना, कल्याणपूर रिफायनरी आणि चकिया कारखान्याच्या स्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ऊस मंत्र्यांच्या निर्देशानंतर आता मोतिहारी कारखान्याचे अधिग्रहण निश्चित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विविध कारणांनी मोतिहारी कारखाना चर्चेत आहे.