समस्तीपूर : डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या पुसा संशोधन संस्थेने उसाची एक नवी प्रजाती विकसित केली आहे. राजेंद्र ऊस ७ नामक या प्रजातीचा आकार मोठा असून लांबी मध्यम आहे. या आकर्षक उसाच्या प्रजातीचा विकास गार्डन केनच्या रुपात करण्यात आला आहे. याची उत्पादन क्षमता प्रती हेक्टर ८८ टन आहे. तर साखर उतारा १७.६२ टक्के आहे. इतर प्रजातींच्या तुलनेत याची उत्पादकता उच्च असल्याचा दावा करण्यात आला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौचे माजी संचालक डॉ. ए. डी. पाठक यांनी २३ मार्च रोजी या नव्या प्रजातीचे अवलोकन केले. यादरम्यान विस्तृत माहिती घेतल्यानंतर त्यांनी या प्रजातीस परवानगी दिली. ईंख संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अनिल कुमार सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले की, छोट्या शेतकऱ्यांसाठी ही प्रजाती वरदान ठरू शकते. या प्रजातीचे बियाणे मोठ्या प्रमाणावर तयार केले जात असल्याचे डॉ. कामत यांनी सांगितले.