बिहार : ऊसतोड मजूर तुटवड्यापासून शेतकऱ्यांना दिलासा, मशीनद्वारे होणार ऊस तोडणी

नरकटियागंज : ऊस तोडणीसाठी आवश्यक असलेल्या कामगारांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता ऊस तोडणी यंत्रामुळे दिलासा मिळणारआहे. त्यामुळे लवकर, कमी खर्चात ऊस तोडणी करणे शक्य होणार आहे. बिर्ला ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या नरकटियांगच्या मगध शुगर एनर्जी लिमिटेडचे युनिट न्यू स्वदेशी शुगर मिल्सने ऊस तोडणी आणि सोलण्यासाठी केन हार्वेस्टर मशीन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रभात खबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पिपरा येथील शेतकरी तारिक बारी यांच्या शेतात ऊसाची तोडणी व सोलून या यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आले.

याबाबत माहिती देताना साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष चंद्रमोहन म्हणाले की, शेतकरी तारिक बारी यांच्या शेतात ऊस तोडणीचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पडले. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव त्यागी, ऊस विभागाचे अध्यक्ष (ऊस) कुलदीप सिंग ढाका, उपाध्यक्ष पी. के. गुप्ता आणि नवी दिल्लीच्या प्रॅगमॅटिक्सचे तज्ज्ञ अमित कुमार आणि इतर ऊस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक केले. यावेळी बगाहा साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक (ऊस), बी. एन. त्रिपाठी, एन. पी. सिंग हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here