बिहारमध्ये पुढील महिन्यात होणार भात खरेदी, सरकारकडून दर निश्चित

पाटणा : बिहारमध्ये भात खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सरकारने राज्यभरातील खरेदीची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये समर्थम मूल्य २०४० रुपये प्रती क्विंटलनसार ४५ लाख टन भात खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. एक नोव्हेंबर रोजी उत्तर बिहार आणि १५ नोव्हेंबर रोजी दक्षिण बिहारमधून खरेदी सुरू होईल. राज्यात आठ हजार ४६३ केंद्रांवरून खरेदी होईल. यासाठी कृषी विभागाने पोर्टलवर नोंदणी सुरू केली आहे. या केंद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक काटा, डस्टर, कर्मचारी व अन्य सर्व सुविधा असतील. प्रशिक्षण व्यवस्था असेल.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भात खरेदीबाबत निर्देश जारी करताना अन्न तथा ग्राहक संरक्षण विभागाचे मुख्य सचिव विनय कुमार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०२२-२३ मध्ये भात खरेदी सामान्य श्रेणीसाठी २०४० रुपये आणि ग्रेड एकसाठी २०६० रुपये प्रती क्विंटल दर निश्चित केला आहे. याबाबतच्या गाइडलाइन जारी करण्यात आल्या आहेत. बड्या शेतकऱ्यांकडून २५० क्विंटल तर इतरांकडून १०० क्विंटल धान्य खरेदी केले जाईल. शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here