बिहार : रीगा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३७ लाखांची बिले अदा

सीतामढी : पाच वर्षांनंतर सीतामढीमध्ये सुरू झालेल्या रिगा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात आली आहेत. रीगा साखर कारखान्याला २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत १६३ शेतकऱ्यांनी १० हजार ५३७ क्विंटल उसाचा पुरवठा केला होता. त्यांना ऊस बिलापोटी ३७ लाख ८१ हजार रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती ऊस आयुक्त अनिल झा यांनी दिली.

साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर आठवड्याला ऊस बिले दिली जात आहेत. शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३७५ रुपये दिले जात आहेत. यामध्ये साखर कारखान्याकडून ३६५ रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १० रुपये प्रती क्विंटल दिले जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही काळापूर्वी प्रगती यात्रेदरम्यान, रीगा साखर कारखान्याचे उद्घाटन केले होते. हा कारखाना गेल्या पाच वर्षांपासून बंद होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here