बिहार : ऊस उत्पादकांचा आवाज बनलेल्या सतीशचंद्र दुबे यांना मोदी मंत्रिमंडळात संधी

पाटणा : बिहारमधील ब्राह्मण समाजाचे नेते मानले जाणारे भाजपचे सतीशचंद्र दुबे यांचा केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले दुबे चंपारण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढणारे शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. दुबे यांनी वेळोवेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणारे नेते अशीच त्यांची ओळख आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एनडीएला मते मिळविण्यात मदत केली. त्यांनी २०१४ ते २०१९ यां दरम्यान वाल्मिकी नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघाचे २०१४ ते २०१९ पर्यंत प्रतिनिधित्व करणारे दुबे हे खासदार होण्यापूर्वी चणपटिया आणि नरकटियागंजचे आमदारही होते. दुबे यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला उच्च वर्गाची जास्तीत जास्त मते मिळविण्यात मदत होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. दुबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here