बिहार: कारखान्याकडून गावागावांत ऊस सर्वेक्षणाला गती

गोपालगंज : राज्य सरकारच्यावतीने आता साखर कारखान्यांच्या सहयोगाने राज्यात ऊस सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. आगामी गळीत हंगामासाठी किती ऊस उपलब्ध होईल याची पडताळणी केली जात आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सिधवलिया साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जवळपास २५४ गावांमध्ये उसाचा सर्व्हेकेला जात आहे. हे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सिधवलिया कारखान्याचे सरव्यवस्थापक शशी केडिया यांनी सांगितले की, सर्वेक्षणाच्या कामात सहभागी कर्मचाऱ्यांना पारदर्शकता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर आगामी गळीत हंगाम सुरू करण्यासाठीचे कारखान्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार आहे, असे सरव्यवस्थापक केडिया यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here