बिहार : शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे पुरवण्यासाठी साखर कारखान्याकडून विशेष उपक्रम सुरू

नरकटियागंज : नरकटियागंज साखर कारखाना व्यवस्थापनाने परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, साखर कारखाना व्यवस्थापन अनुदानित दरात कृषी उपकरणे पुरवत आहे. याबाबत हिंदुस्तानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रांच्या सुविधा पुरवल्या जात आहेत.

याबाबात माहिती देतना ऊस उत्पादक मंडळाचे कार्यकारी उपाध्यक्ष कुलदीप सिंग ढाका म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, त्यांना स्वयंचलित ऊस कटर प्लांटर, ऊस पेरणी यंत्र, विविध प्रकारचे प्लेव्ह्यूज अशी डझनभरहून अधिक प्रकारची उपकरणे पुरवली जात आहेत. या उपकरणांमुळे शेतकरी अतिशय कमी खर्चात शेती करू शकतील. साखर कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांचा ऊसासह इतर पिकांच्या लागवडीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळू शकेल. ऊस उत्पादक कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष पी के गुप्ता म्हणाले की, छोट्या शेतकऱ्यांना अतिशय कमी भाड्याने आधुनिक यंत्रांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here