बिहार : उसाचा वाढीव दर लवकर देण्याची ऊस आयुक्तांची बैठकीत सूचना

नरकटियागंज : नरकटियागंज साखर कारखान्यात मुख्यमंत्री ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ऊस आयुक्त अनिल कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीत राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १० रुपये लाभ तातडीने देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला सहाय्यक ऊस आयुक्त वेदव्रत, ऊस अधिकारी श्रीराम सिंह, कार्यकारी अध्यक्ष चंद्रमोहन, कार्यकारी उपाध्यक्ष राजीव कुमार त्यागी, कुलदीप सिंह ढाका, पीके गुप्ता, रजनीश कुमार सिंह इत्यादी उपस्थित होते.

उसाला दहा रुपये वाढीव दराचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना विनंती करण्यात आली की त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर साखर कारखान्याकडे जमा करावीत. तरच राज्य सरकारने दिलेला दर त्यांच्या बँक खात्यात पाठवता येईल. या बैठकीत मुख्यमंत्री ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस बियाणे, कीटकनाशके, जैव कंपोस्ट आणि सिंगल बडवरील अनुदानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आधार कार्ड आणि इतर प्रमाणपत्रे गोळा करण्याचे काम साखर कारखान्याकडून सुरू आहे अशी माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here