बिहार: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २८ जानेवारीला कारखान्यांसमोर आंदोलन

पटना: बिहार राज्य ऊस उत्कर्ष किसान महासभेने आपल्या विविध मागण्यांसाठी २८ जानेवारी रोजी साखर कारखान्यांसमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये उसाला ४०० रुपये प्रतिक्विंटल किमान समर्थन मूल्य (एमएसपी) द्यावे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेची पूर्तता करावी आणि रीगा साखर कारखान्याचा गळीत हंगाम तातडीने सुरू करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

सिकटा येथील सीपीआयचे आमदार आणि महासभेचे राज्य संयोजक बिरेंद्र प्रसाद गुप्ता म्हणाले, पक्षाचे सदस्य आणि कार्यकर्ते २८ जानेवारी रोजी सर्व साखर कारखान्यांसमोर आपल्या मागण्यांना पाठबळ देत धरणे आंदोलन करणार आहेत. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष के. डी. यादव आणि बिहारचे राज्य सहसंयोजक उमेश सिंह म्हणाले, ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना वापराव्या लागणाऱ्या खते, किटकनाशकांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ऊस दरात वाढ झालेली नाही. सीतामढी येथील रीगा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आणि कारखान्याचे ७०० कामगारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारखाना तातडीने सुरू करण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here