समस्तीपुर : बिहार राज्य किसान सभेच्या बिथान अंचल किसान काऊन्सीलची बैठक रामसिंघासन यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आधीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २०२२-२३ मधील सदस्यता अभियानाला अंतिम रुप देण्यात आले. २० जुलै रोजी साखर कारखान्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा मंत्री सत्यनारायण सिंह यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत २० जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.
या अंतर्गत साखर कारखान्याच्या व्यवस्थापनांच्या समोर आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व कायर्कर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राम लखन महतो, रामचंद्र यादव, कमल नारायण यादव, अखिल देव भारती, राम सिंहासन आदी उपस्थित होते.