बिहार : ऊस उद्योग विभागाच्या सचिवांकडून साखर कारखान्यांची पाहणी

गोपालगंज : ऊस उद्योग विभागाच्या सचिवांनी गुरुवारी सिधौलिया आणि विष्णू साखर कारखान्यांसह बंद असलेल्या सासामुसा साखर कारखान्याची पाहणी केली. सचिव बी. कार्तिकेय धनजी यांनी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. सरकारने जादा ऊस उत्पादनासाठी चालवलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या प्रगती यात्रेदरम्यान उसाच्या किमतीतील वाढीव रकमेच्या वितरणाबाबतही सचिवांनी माहिती मागितली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे वाटप यावेळी करण्यात आले. सासामुसा साखर कारखान्यचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सचिव धनजी यांनी यावेळी सांगितले.

ऊस आयुक्त जयप्रकाश नारायण सिंह म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि पीक संरक्षण इत्यादींबाबत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विभाग खूप गंभीर आहे. मुख्यमंत्री ऊस विकास कार्यक्रम, ऊस यांत्रिकीकरण योजना, ब्रीडर बियाणे उत्पादन योजना, पायाभूत बियाणे उत्पादन, प्रमाणित बियाणे उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम, कीटक आणि रोगांपासून संरक्षण योजना, सेंद्रिय खते, चांगल्या जातींची रोपवाटिका इत्यादी कामे केली जात आहेत. कार्यक्रमात ऊस उद्योग विभागाचे सचिव, जिल्हा ऊस अधिकारी राहुल कुमार, विष्णू साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक पीआरएस पणीकर, डीपीआरओ पूजा कुमारी आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here